Total Pageviews

Saturday, 10 September 2011

तू सोडून गेलास म्हणून काय झालं
मी जगायचं नाही सोडून दिलं
हिम्मत न हरता मनाला सावरायचं केलं
झाडाचं फूल तोडलं म्हणून
फांदीच पान गळून नाही गेलं
पुढच्या क्षणी झाडाला नवीन फुल उमलून आलं
म्हणून तर मी आता स्वतःला आवरायचं केलं
आयुष्यात पुन्हा नवीन जग शोधण्यासाठी 
ध्यान माझं खेचत नेलं
आता त्याला न आठवता मन माझं
दुसरीकडेच वळत गेलं....

प्रिती रोकडे -

Thursday, 1 September 2011

मनी तू, ध्यानी तू , 
स्वप्नी तू, नयनी तू , 
इथे तू, तिथे ही तू 
सकाळ तू, रात्र तू , 
पाऊस तू , वारा तू, 
सावली तू ,उन्ह ही तू,
नक्की कुठे कुठे शोधू तुला 
बस झाला आता उगाच
नको येऊस सारखाच मध्ये मध्ये तू .......
प्रिती रोकडे -

Wednesday, 31 August 2011

रोजच्या धावपळीत नकोसं वाटतंय
कुठे एका ठिकाणी जावं असं भासतंय 
पण साथ हवी कुणा एकाची 
त्याला तर वेळच नाही मला भेटायची
मग का करावी आशा त्याची येण्याची 

प्रिती रोकडे -

Sunday, 28 August 2011

स्वप्न तुझे पाहताना
काही क्षण मी हरवून गेली
समोरून हाक कानावर पडली
डोक्यावर सूर्य आलाय
उठ आता सकाळ झाली...

प्रिती रोकडे -

  


Thursday, 25 August 2011

" तू "


हसतना समोर दिसतोस तू,
रडताना समोर येतोस तू,
चालत असताना भास होतो मला
अस वाटत की बाजूल आहेस तू,
आणि भवताली पण भासतोस तू,
पुस्तक वाचताना प्रत्येक 
पानावरच्या एक एक शब्दामध्ये 
वसलास तू,
रोज येणाऱ्या आठवणीनमध्ये 
रमतोस तू,
भर पावसात भिजलेल्या अंगावर पडलेल्या 
पाण्याच्या थेंबाचे स्पर्श देऊन जातोस तू,
रात्रीच्या स्वप्नात स्वप्नं बनून येतोस तू ,
आणि पहाटेच्या वेळी प्रकाश देऊन जातोस तू ,
मग का येत नाहीस लवकर प्रत्यक्ष समोरासमोर तू......
प्रिती रोकडे -

Wednesday, 3 August 2011

गोलुमोलू :)


गोजिरवान रूप तुझं
गोड गोड गाल 
ओठ तुझे गुलाबी 
निरागस आहेत डोळे 
इवले इवले हात तुझे 
नाजूक आहेत पाय 
पाहतोस कसा टकमक 
असा हसतोस गालातल्या गालात 
कारण दिसतोस गोलुमोलू  :)  :) :)













                                                 प्रिती रोकडे -

Tuesday, 2 August 2011

तुझ्याविना आयुष्य जगणं
आता असह्य झालं आहे 
जसं एखाद पाखरू 
पाण्यासाठी वणवण 
भटकत आहे.

                  प्रिती रोकडे -
जीवनात जे आपल्याला हव असतं 
ते सहजासहजी मिळत नाही
परंतु जीवनाचे हे एक सत्य आहे 
की जे आपल्याला हव असतं 
तेच मिळवणं फार कठीण असतं...

                           प्रिती रोकडे -

Monday, 1 August 2011

माणूस

माणूस
 (-_-)
  /[ ]\
  _/\_


ना धर्म, ना रिती,
ना जात, ना पात
मग का नाही
माणसाला माणसाची साथ?

एक देह, एक रक्त
मग का माणूसच करत आहे
माणसाचा घात?

शेवटी माणूसच पेटवत आहे
माणसांच्या देहांच्या रक्तांची होळी
म्हणूनच माणूसच खेळत आला आहे
आपल्याच माणसांच्या आयुष्यांची खेळी?

होतेय आता गुन्हेगाराचि गाथा
त्याला न राहिली माणुसकीची प्रथा.


प्रिती रोकडे - :)

Friday, 29 July 2011

मी

अशी मी, तशी मी 
माझं मलाच ठाव नाही कशी मी ???
राग एकदम नाकाच्या शेंड्यावर 
हसणं मला जमतंच नाही  
काय करावं नी काय बोलावं
मला काही कळतच नाही 
एकटीच विचार करते बसते 
तेव्हा माझं मन खूपच रमते 
मनात माझ्या मीच असते 
मी स्वतःवरच सर्वात जास्त प्रेम करते 
मनातले सारं माझं दुख मी कुणालाच 
सांगत नाही 
मला पूर्ण समजून घेणारं अजून कोणी
भेटलंच नाही ... ? 
                                     
                                     प्रिती रोकडे ,

Thursday, 28 July 2011

नातं.......

दुख सहन केल्याशिवाय
सुख उपभोगता येत नाही 
जोडल्याशिवाय जुळत नाही 
बोल्याशिवाय उमजत नाही 
ऐकल्याशिवाय समजत नाही 
केल्याशिवाय कळत नाही 
लिहिल्याशिवाय वाचता येत नाही 
बघितल्याशिवाय दिसत नाही 
जळाल्याशिवाय करपत नाही 
पिकावल्याशिवाय उगवत नाही 
कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही 
प्रेमात पडल्याशिवाय प्रेम होत नाही 
मैत्री केल्याशिवाय मैत्रीचे नाते जपता येत नाही 
नातं समजून घेतल्याशिवाय नात्याच्या 
रेशीम बंधात गुंतता येत नाही 
कारण नातं हे असं एक बंधन आहे 
की ते तुटल्याशिवाय तुटत नाही .....




                                            













                                                                     प्रिती रोकडे .....

Sunday, 26 June 2011

कशाला ??

असं सोडून जायचंच होतं तर 
माझ्या आयुष्यात आलासच कशाला??
असं सुंदर स्वप्न दाखवायचं होतं 
तर स्वप्नं दाखवलसच कशाला??
असा हात हातात धरून कायम सोडूनच दयायचाच होता
तर हात हातात घेतलासच तरी कशाला ???
तुला दिलेले गुलाबाचे फुल पायाखाली तुडवायचेच  होते 
तर माझ्या कडून त्याचा स्वीकार केलासच तरी कशाला ??
तुझं प्रेम नव्हतंच माझ्या वर तर प्रेमाच्या चार भाषा 
शिकवल्यास तरी कशाला??
असं शेवट पर्यंत डोळ्यात अश्रू  दयायचेच होते तर
आनंदी क्षण दाखवलेस तरी कशाला ????
आयुष्य भर साथ देईन तुला असं वचन देऊन परत माघार 
घेतलीसच कशाला ??
माझं मन असं दुखवायचंच होतं तर जुळवलस तरी कशाला ??
तू मला विसरून गेलास मग मी तुला आठवू तरी कशाला ???






















                                               प्रिती रोकडे .................

Saturday, 18 June 2011

Marathi Buzz Mandal. Slideshow

Marathi Buzz Mandal. Slideshow: "TripAdvisor™ TripWow ★ Marathi Buzz Mandal. Slideshow ★ to Mumbai (Bombay). Stunning free travel slideshows on TripAdvisor"

Saturday, 11 June 2011

" मोबाईल फोन "

एक नुसता मोबाईल फोन 
सांगा पाहू बोलतंय कोण ??
पण लय भारी त्याची रिंग टोन
वायब्रेट करून अंग होतंय रोम रोम
असतो बोलताना सवांध फक्त व्यक्तींचा दोन 
मोबाईलच्या शोकामुळे बिझी झालाय प्रत्येक झोन...,




                                                                       
                                                                              














 प्रिती रोकडे ........





Thursday, 9 June 2011

" तिजोरी "

तुझ्या आठवणींची आता मी तिजोरी बनवली आहे
त्या तिजोरी मध्ये तुझ्या आठवणी साठवून ठेवल्या आहे
तू दिलेल्या या सर्व गोष्टींचा प्रेमळ (प्रेम, साथ,नात,
स्पर्श, बोल) साठा करून ठेवला आहे
तुझ्या ह्या आठवणी मला सोन्याहून ही परिपूर्ण आहे
कधी आली तुझी आठवण तर हीच तिजोरी खोलून मी माझ्या 
मोडलेल्या हृदयाशी कवटाळल्या आहे
त्या तिजोरीच्या  दर्पणात मी आपलं नात शोधत आहे
कारण मी या आठवणींची तिजोरी बनवली आहे..




                                                     




























                                                                                      प्रिती रोकडे ..
                                                 
 

Wednesday, 8 June 2011

पाऊस....,

आला आला गार वारा 
मन माझे मोहून गेला 
आता येई रिमझिम 
पावसाच्या धारा,
हळूच वारा सांगून गेला 
तू पण ये ग सखे या 
पावसात अन घे माझ्या 
संगे बेधुंद पावसाचा मारा..,



























                                                   
                                                                     प्रिती रोकडे ............

                    
                                

Sunday, 5 June 2011

" आवडेल मला "

तुझ्या सोबत पावसात चिंब भिजायला आवडेल मला 
पावसाच्या सरी आल्यावर ते टपोरे थेंब माझ्या चेहऱ्यावर 
पडताच तेच थेंब तुझ्या हाताच्या मुठीत जमा केलेलेले आवडेल मला,
त्या जोरदार पडलेल्या पावसात मेघाच्या गडगड आवाजाने 
तुझ्या अलगद अश्या मिठीत यायला आवडेल मला,
समुद्रकिनारी  येणाऱ्या लाटांसोबत तुझ्या हातात 
हात देऊन मनसोक्त फिरायला आवडेल मला,
त्या थंडगार पावसात गरम गरम भाजलेल्या मक्याचे कणीस 
तुझ्या बरोबर खायला आवडेल मला,
तोच पाउस सारखा सारखा बरसत राहून तुझ्या त्या 
पावसातल्या आठवणी घेऊन बरसायला आवडेल मला....




                                                                                   




















                                           प्रिती रोकडे .........................
 

Saturday, 4 June 2011

प्रेम हे प्रेम असतं तुमच आमचं सेम असतं................

               प्रेम हे प्रेम असतं तुमच आमचं सेम असतं . कुणी तरी  करतं म्हणून ते करायचं नसतं, ते आपोआपचं होत असतं. त्याला फक्त एका चांगल्या व्यक्तीची गरज असते. की जो आपल्याला समजून घेणारा आपल्या प्रत्येक गोष्टीत साथ देणारा, कोणत्या ही संकटी आपल्याला मदतीचा हात देणारा असावा. 
               प्रेम असत दोन जीवाचं आत्मचरित्र  नसतो भातुकलीचा खेळ लहानपणी भातुकलीच्या खेळात  आपण  भावला  भावलीचा लग्न  लाऊन देतो. पण ते भातुकलीच्या खेळा पर्यंतच मर्यादित असतं. त्याचप्रमाणे 
प्रेम करायचं म्हणून करायचं नसतं त्यामागे दोन मन जोडलेली असतात. एकमेकांचा एकमेकांवर असलेला विश्वास कायम असावा लागतो, ते कुठेही डगमगलेला नसावा लागतो. जीवापाड एकमेकांवर प्रेम असावं लागतं. त्यातील प्रेमाचा आत्माविश्वास टिकवावा लागतो.
             प्रेम असतं दोन आत्म्यांचा मिलाप त्याच बरोबर दोघांचा असलेला समजूतदारपणा, समंजसपण, आणि महत्वाचं म्हणजे दोघांच्या भावना या सर्व गोष्टींचा मेळ असावा लागतो. तरच याला आपण प्रेम करणं किंव्हा प्रेम मिळणं असं म्हणायला काहीच हरकत नाही. काही लोक प्रेम होतंय म्हणून करतात पण त्या मागे त्यांचं काही तरी कारणस्थान असतं. आणि त्या प्रेमाला काहीही योग नसतो. ते फक्त एकमेकांच्या भावनांशी खेळत असतात त्याला शेवट असा काहीच नसतो. पण जे खऱ्या अर्थाने प्रेम करतात त्याचा शेवट नक्कीच खरा ठरतो कारण ते एकमेकांचा साथ आयुष्यभर निभावनाच्या तयारीत असतात. तर काही जण मधेच एकमेकांचा साथ सोडून जातात. यातून एकच मार्ग हाती लागतो ते म्हणजे आत्माहत्या.
                        या जगात खरं प्रेम करणारे ही पुढे आयुष्यभर साथ न देताच आपल्या प्रेमाचा शेवट करतात. कारण त्यांना त्यांच्या समाजाची , आपल्या परिवाराची इज्जत कायम ठेवायची असते, पण ते प्रेम करण्याच्या आधी याचा विचार करत नाही त्यांना नंतर याची जाणीव होते.    
                        अजून मला असं बोलावसं वाटतं की याच जगात एक तर्फ्फी  प्रेम करणारे ही असतात. त्यांना त्यांचं प्रेम नाही मिळालं की वाट्टेल ते करायला तयार असतात. तर या जगात मी तुझ्या वर जीवापाड प्रेम करतो असे आश्वाशन देणारे ही खूप असतात. पण त्यांच्या मनात असं काहीच नसतं. त्यांना फक्त दुसर्याच्या भावनांशी खेळायला मज्जा येत असते. याचा ते पुरेपूर वापर करून घेत असतात. कारण त्यात शेवट शेवट पर्यंत प्रेमाचा एक ही अंश नसतो.
               




                                                                                                        प्रिती रोकडे .......................



Monday, 9 May 2011

" फक्त तुझ्यासाठी "

            तुझंविण

रातीच्या काळोखात चंद्र 
ठेवी चांदण्यांचा पहारा, 
असा कसा झोंबतो 
हा थंड गार वारा,
हळूच स्पर्श  करुनी 
छेडी मज प्रेमाच्या तारा,
बरसूनी आल्या 
पावसाच्या जश्या संथ धारा,
आठवून येई तुझा
प्रेमाचा गंध हा न्यारा 
तुझंविण मी नाही 
आणि मजविण तू 
नाही असा आहे हा 
नियतीचा खेळ सारा .......................















प्रिती रोकडे ..........................

Tuesday, 3 May 2011

जीवन हे असेच असते ..

            जीवन 

जीवन हे असेच असते 
घडयाळाच्या काट्याप्रमाणे 
दिवस रात्र फिरत असते 
घडयाळाच्या वेळेप्रमाणे 
दिनमान बदलत असते  
त्याचप्रमाणे जीवनाचे 
राशीचक्र सतत बदलत असते, 














जीवन हे असेच असते 
जळणाऱ्या मेणबत्तीच्या 
ज्योतीप्रमाणे पेटत असते
जोपर्यंत पेटत आहे तोपर्यंत 
प्रकाशाप्रमाणे तेजोमय असते 
आणि विझली की अंधारमय होते 
जीवनात पण जोपर्यंत 
सुख आहे तोपर्यंत ते जीवन 
सुखमय आहे आणि जोपर्यंत 
दुख: आहे तोपर्यंत ते दुख: मय असते,














जीवन हे असेच असते 
सुखाचे चार दिवस घेऊन जगणारे  
तर दुखाचे ओझे आयुष्यभर भोगणार
जीवनात असह्य अशी गोष्ट काहीच नसते 
जीवनात माणसाला प्रेम मिळाले नाही की
त्याला ते जीवन जगणं फार कठीण असते.....
















जीवन हे असेच असते 
जो यशप्राप्ती साठी चांगल्या 
मार्गाची पायरी चढतो तोच 
या जीवनात यशस्वी ठरतो 
आणि जो चुकीच्या  मार्गाची 
पायरी चढतो तो अपयशीच राहतो..






















जीवन हे असेच असते 
जीवनात मनुष्य एक 
साधारण जीवन जगत असतो 
आणि शेवटी मृत्यूला कवटाळून
मृत्यूच्या वाटेकडे धाव घेतो
तिकडेच तर त्याचा शेवट लिहिलेला असतो.  


















प्रिती रोकडे ..........

Saturday, 30 April 2011

" फक्त तुझ्यासाठी "

           गालावरची खळी 

तुझ्या गोरया गोरया मुखडया वरती  
लावली चंद्रकोराची टिकली कपाळी, 
तू हसलीस अशी लाजून अन पडली 
तुझ्या दोन्ही गालावरी खळी, 
चंद्र  ही  झाला तुला पाहून 
तुझा बळी,
अन गुलाबाच्या रोपट्यावरती 
उमलून आली जशी नाजूकशी कळी !!!!!!!!!!!!!




















प्रिती रोकडे ................
  




Friday, 29 April 2011

" फक्त तुझ्यासाठी "

                         नजर 
एकदा नजर माझी तुझ्या नजरेशी भिडली होती,
तीच माझी नजर तुझ्या नजरेला 
भिडण्यासाठी चोहीकडे फिरकत होती,
उंबरठयात उभी राहून मी 
माझी नजर तुला तू येण्याच्या 
दिशेने धाव घेत होती,
पण तू न येण्याच्या विरहाने ती नजर 
काही क्षणातच कायमची झुकली होती,
कसं सांगू आता माझ्या या हळव्या मनाला 
तू कधीच येणार नाहीस 
त्या भावूक अशा नजरेला तुझी एकच 
येण्याची चाहूल लागली होती ..............





















प्रिती रोकडे .......................

Wednesday, 27 April 2011

My Sketching...


"फक्त तुझ्यासाठी "

             स्वप्नं

स्वप्नांच्या भोवरयात मी 
अशी कशी गुंतलेले होते,
कधी सकाळ उजाडली अन
कधी रात्र दुरावली मला   
कसलेच  भान नव्हते, 
कोणीतरी हाक मारतंय 
मला माझे मन 
त्याच्याकडे वळवत होते, 
ती हाक माझ्यासाठी खूप 
काही सांगून गेली कारण 
त्यात कोणाचे तरी 
हृदयस्पर्शी बोल होते, 
या स्वप्नातून कशी मी 
बाहेर पडू आता त्याच्या
प्रेमाचे बोल मला मजपासून 
हृदयातून थेट 
काळजापर्यंत खेचत होते .........




















प्रिती रोकडे ................................











Friday, 15 April 2011

"फक्त तुझ्या साठी "

का कळत नाही या वेडया मनाला 
आपल्यासाठी काय चांगले नि काय वाईट 
इतकं का कोणासाठी वेडं होतं हे मन त्यालाच माहित
कारण याच वेडया मनाला असते त्या व्यतीच्या
मनापासूनची आयुष्य भराची एक सर्वस्व भेट .................



















प्रिती रोकडे .....................

Thursday, 24 March 2011

कारण मलाच काही कळत नाही......................

हट्टीपणा आहे माझ्या अंगात तर
समजूतदार पणाची काय बातच नाही
कारण  मलाच काही कळत नाही,

मित्र -मैत्रिणी खूप आहेत माझे 
समजून मला कोणी घेतच नाही
कारण मलाच काही कळत नाही,

ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले 
त्यानी मला कधीच समजून घेतलंच नाही
कारण मलाच काही कळत नाही,

विश्वास ठेवते ज्यांच्यावर
तेच माझा विश्वास घात करतात 
का कारण मलाच काही कळत नाही,

मीपणाने वागते मी आणि
तोच मी पणा माझ्याच अंगी भवतो मला
कारण मलाच काही कळत नाही,

कोणी तरी रागवले म्हणून
मुळूमुळू रडणे आणि,
कोणी तरी जोक केला म्हणून 
खिदीखिदी हसणे एवढेच येते मला
कारण मलाच काही काळात नाही,

चांगले काय आणि वाईट काय
यातील फरक माहितच नाही
म्हणून तर म्हणते मी
कारण मलाच काही कळत नाही
कारण मलाच काही काळात नाही ..........................................................
 



 











प्रिती रोकडे ..................

सांगा ना सख्या तू असं का केलसं...............

सांग ना रे सख्या तू असं का केलसं
जीवनाच्या वाटेवर असं अर्धवट सोडून वेड का केलसं
प्रेमाच्या रंगात रंगताना रंग असे उधळून का गेलास,
तुझं नाव मला माझ्या नावाशी जोडायचं होतं
तेच नाव घेऊन मला या जगात वावरायचं होतं,
रोज आठवण करत होते तुझी
तू माझी अशी आठवण न करता कसा काय राहिलास,
हात हातात घेऊन तुझा मला या वाटेवर चालायचं होतं
पण आज तोच हात सोडून एकटाच कसा काय गेलास,
प्रेमाचे दोन अबोल शब्द तुझे  मला ऐकायचे होते आणि
तेच शब्द ऐकायला माझे कान आतुरतेने वाट पाहत होते,
सांग ना रे सख्या तू असं का केलसं
जीवनाच्या वाटेवर असं अर्धवट सोडून वेड का केलसं ............................

 





























प्रिती रोकडे ...............

का कुणास ठाऊक ??????

का कुणास ठाऊक आज असं का वाटतंय
कुणीतरी माझी सारखी राहून राहून आठवण काढतंय
आठवण काढून माझी,
त्याची मला आठवण करून देतंय
त्याच्या या आठवणीन माझा मन फार झुरतय
काही क्षणातच डोळ्यांमधून असं पाणी का वाहतंय ???????????


 

























प्रिती रोकडे .....
 

मृत्युंजयी................

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं.
या मरणानं मला दोनदा निराधार केलं.
मी त्याचं सूड घेईन! मी जिंकेन मरणाला !
मला कैवल्यवाणी येते .....
निरामयीन पोथी समोर धरली आणि हात जोडले.
तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली.
कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाडयावर!
वाडा गदागदा हलला. क्षणमात्र आणि दुसरयाच क्षणी त्याचं छप्पर ढासळल!
बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले.
निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजून सुटली
आणि खाली येऊ लागली.
भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली.
त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही.
वरून खाली येणाऱ्या मृत्युकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली.
तिनं मृत्यूला डिवचल  होतं .
ती पोथी वाचायची असा निश्शय करून!
म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता..

                                          पुस्तक - मृत्युंजयी !!!!
                                       लेखक - रत्नाकर मतकरी......

काही नको मला....

काही नको मला फक्त तुझी साथ हवी
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी
केलेस प्रेम माझ्यावर तर ते
आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी
सोडून जाऊ नकोस कधी मला
हीच एक तुझ्या कडून अपेक्षा हवी
जरी मी कधी सोडून गेले तुला
तर ते सहन करण्याची तुझी तयारी हवी
कधी सुखात तर कधी दुखात
तुझ्या आधाराची फक्त मला गरज हवी.......




















प्रिती रोकडे.........
 
 

Monday, 21 March 2011

प्रेमात पडलं की.............

प्रेमात पडलं की हे असच असतं
वेड मन सारखं कविता करायला लागतं
दिवस रात्र फक्त त्याच्या स्वप्नात रमतं
नाही नाही म्हणता मन फक्त त्याचाच विचार करतं
तो समोर नसला की मन उदास होऊन रडतं
नको त्यावेळी त्याच्या फोनची वाट पाहत बसतं
त्याचा फोन किवां sms नाही आला की मन फार झुरतं

त्याने होकार नाही दिला तरी मन त्याच्या वरच मरत
कारण प्रेमात पडलं की हे असच असतं हे असच असतं ...........................



















प्रिती रोकडे ...............
 

Sunday, 20 March 2011

रंगात रंग उधळून ............

अंग अंग भिजले रंगात रंगून नाहले
माझ्या अंगाला रंग लागला मी हळूच लाजले
आज होळीचा रंग बाई गुलाल घेऊन साजले
कान्हाने पिचकारीने पाणी राधा वर उडविले
वसंतात मोर जणू थुई थुई नाचू लागले  
रंगात रंग उधळून मी धन्य धन्य जाहले 
जणू सप्तरंगी रंगात मी इंद्रधनुष्य पाहिले 
लाल, गुलाबी, पिवळा रंग एकत्र सामावले 
त्या सप्तरंगी रंगांना जणू माझे स्पर्शच लाभले ..........





 



काय तुझ्या मनात

काय तुझ्या मनात
सांग माझ्या कानात
आपण दोघे राजा राणी 
हरवून जाऊन स्वप्नांच्या ध्यानात !!!!!!!!!!!!!
 
 
 
 
 
 
 
 
 
  प्रिती रोकडे ........

Saturday, 19 March 2011

झम्पी .....................

एक व्हती  झम्पी लई मस्ती करायची
दिवस उगवला की गावभर हिंडायची
लोंकांची भांडण सतत आणायची
दिवसभर हिंडून घराकडं निघायची
आईन विचारलं की म्या काही नाई केलं म्हणायची
आईन मारलं की लई मुळूमुळू रडायची
रडत रडत कोपरयात रुसून बसायची
बापान लाड केला की खुद्कून हसायची



















   प्रिती रोकडे...............

Friday, 18 March 2011

मी आणि माझा रोजचा प्रवास ..........,


         तशी मी रोज ऑफिस मधून ७ :०० ला निघते आणि बस stop वर उभी राहून ८७ नंबर बसची वाट पाहते. मग बस आली कि ८:०० वाजे पर्यंत घरी पोहोचते. तारीख १७.०३.२०११, वार गुरुवार, वेळ ७:०० ला ऑफिस मधून सुटल्या वर पुन्हा रोज सारख बस stop उभी राहून बसची वाट पाहत होते पण काही करून ८७:०० नंबर बस लवकर येईना अर्धा तास वाट पाहिली मग थोडया वेळाने ९१ नंबरची बस आली. मी कशी तरी बस मध्ये चढली आणि बस मध्ये उभी राहिली, एवढी गर्दी होती कि बसण्यासाठी  सीट पण खाली नव्हती. बस दादर(प्रभादेवी) पोर्तुगीज चर्च पासून ७:३० ला निघाली थोडी पुढे गेली आणि ट्राफिक एवढी होती कि ती थांबत थांबत चालत होती त्यात गर्मीचा दिवस एवढे गरम होत होते कि विचारू नका, बसयाला जागा नाही हवा यायला जागा नाही. 
         थोडया वेळाने बस माहीम पर्यंत आली पण तिथे हि ट्राफिक मग मला अजून राग आला आणि मी  मनातच बोलू लागले कधी घरी पोहोचणार?? थोडा वेळ मी जरा शांत उभी राहिली, तितक्यात माझ्या समोर असलेल्या सीट वर बसलेल्या महिलेने मला विचारले कि किती वाजले?  मी म्हणाली  ७:४५ झाले. ती अजूनच विचारात पडली कि मी कधी घरी जाणार कारण तिच्या घरी तिचे लहान बाळ होते ती सारखी बोलत होती कि ते वाट पाहत असेल कि रडत असेल, तेवढयात त्या महिलेला घरून फोन आला कि कुठे आहेस ती महिला बोलली कि मी बस मध्ये आहे आणि खूप ट्राफिक  आहे म्हणून काही क्षणात फोन वर बोलता बोलता फोन बंद पडला ती अजूनच वैतागली मला त्या महिले कडे पाहून जरा कीव वाटू लागली पण बस मात्र  काही जागे वरून हलतच नव्हती. पण त्या महिलेची चिंता वाढतच चालली होती  ती मला मधून-मधून वेळ विचारत होती कि किती वाजले.
         त्यानंतर त्या महिलेच्या पुढच्या सीट वर एक मुलगी आणि तिची वाहिनी बसली होती तिच्या कडे पण लहान बाळ होते पण ते झोपलेले होते काही क्षणात ती लहान बाळ उठले आणि रडू लागले कारण त्या बाळाला गरम होत होते तिची आई तिला शांत करत होती पण ती लहान मुलगी शांत होईना खूपच रडत होती. थोडया वेळाने बस थोडी चालू झाली मग जरा थोडी हवा येऊ लागली मग ती लहान मुलगी शांत झाली. त्या मुलीची आजी पण तिच्या सोबत होती तिला हि घरची चिंता वाटू लागली कि माझे दोन मुले आहेत त्यांना हि कामाला जायचे आहे त्यांना पण जेवण नाही कधी पोहोचणार घरी??  असे त्या आजी पण बोलू लागल्या. आणि ती महिलाही हि मधून मधून बोलतच होती कधी घरी पोहोचणार ???? 
        काही वेळाने माझ्या बाजूला उभी असलेली महिला पण मला विचारू लागली कि किती वाजले?  माझ्या घरी पण माझे लहान मुल आहे ते दीड वर्ष्याचे आहे ते रडत आहे कि झोपले आहे असे मला सांगत होती. मी हि ते ऐकत होते. तशी मला पण आईची आठवण झाली कि माझी आई पण वाट पाहत असेल माझी? कोणी आपल्या हातातल्या घड्याळ कडे  पाहत होती अजून किती वेळ हि ट्राफिक असणार आम्ही घरी कधी पोहोचणार? तेवढयात मी आईला फोन केला आणि सांगितले कि मला उशीर होईल घरी यायला, खूप ट्राफिक आहे आणि मी माहीम पर्यंत पोहोचली आहे तितक्यात आई बोलली कि निट ये घरी . थोडया वेळात बस माहीम पासून निघाली आणि बांद्रा पर्यंत पोहोचली सगळ्या प्रवसांच्या जीवात जीव आला आणि बस भर वेगात चालू लागली. तसा मला पण आनंद झाला कि मी आता घरी जाणार कारण मला भूक पण खूप लागली होती आणि बस मध्ये उभे राहून पाय पण दुखत होते .मग मी बांद्रा ला उतरली आणि घरी आली. घरी येऊन आई बाबांना सगळा घडलेला बस प्रवास प्रकार सांगितला . 
        मला फक्त या लिहिलेल्य लेखनातून  एवढच सांगायचे आहे  कि, आईला तिचे मुल लहान असू कि मोठे असू त्याची  तिला चिंता असते. शेवटी ती एक आई आहे. बोलतात ना....,
       "स्वामी तिन्ही जगांच्या आई विना भिकारी "........










                                                                                                           


         
                                                                                     प्रिती रोकडे .............

Wednesday, 16 March 2011

तू तिथं मी..,

तू जिथे जिथे जाशील
तिथे तिथे तुझ्या पाउलखुणा असतील
त्याच पाउलखुणाना मी माझ्या म्हणून समजील
आणि तू नसताना हि त्याच पाउलखुणा मी जपून ठेवील.............






प्रिती रोकडे ............................

फक्त तुझ्या साठी.................

तुझ्या हृदयात मला थोडीशी जागा दे
जास्त का होईना पण थोडासा आश्रय दे
त्या गडगडणार्या मेघांच्या आवाजने
तुझ्या घट्ट मिठीत मला आधार दे
तुझ्या त्या भारावून टाकणाऱ्या नयनांना
माझ्या नयनात हरवून दे
तुझ्या गोडगुलाबी ओठांनी माझ्या
नाजूक ओठांना स्पर्श दे
तुझा हात माझ्या हातांशी जुळवून घे
माझे मन तुझ्या मनाशी मिळवून घे
तुझ्या नावशी माझ्या नावाला अर्थ दे
प्रेम करते तुझ्यावर एक हे माझे 
म्हणणे तू जरा अवश्य समजून घे ............




















                                                               प्रिती रोकडे .............................


 

तुझ्या ओठांवरील बोल.........

ते बोल मनातलं मनात ठेवण्यापेक्षा
मनातून ओठांवर येऊ देत
तुझे बोल,
मग बोलशील की
मला काय बोलायचे होते ते बोल
मी शेवटी बोलून टाकले बोल
आता बोल आता बोल

बोलून टाक तुझे बोल !!!!!!!!!


                        













   प्रिती रोकडे ..........