Total Pageviews

Tuesday, 10 December 2013

मी मला शोधते माझ्याच प्रतिबिंबात
मी मरून जगते माझ्याच अंतकरणात
मी हारुन जिंकते माझ्याच जगात……

प्रिती रोकडे - :)




Friday, 12 July 2013

दाटून येता 
मेघ हे प्यारे,
रिमझिम 
बरसता पाउस 
भिजले काया  
ओलेचिंब सारे,
स्पर्श करूनी मज 
लपंडाव खेळती 
हे बेदुंध गार वारे….,

प्रिती रोकडे  - :)




 

असा का बरसला 
मुसळधार पाऊस
मग आली त्याची 
आठवण आणि 
झाले मी भावूक,
कळवळू लागला 
जीव माझा 
का कुणास ठाऊक??

प्रिती रोकडे - :)

Monday, 17 June 2013

या मुसळधार पावसात 
मी चिंब भिजलेली,  

मन होताच बेधुंद 
तुझ्या मिठीत 
मी अलगद आली,
स्पर्श तुझा होताच मजला 
मी माझीच न राहिली   
क्षणांची वाट न पाहता 
मी लटकेच तुझ्यात 
सामावून गेली…, 

प्रिती रोकडे - :)

Wednesday, 12 June 2013

पावसाने असं काही बरसावं
कि, मी तुझ्या आठवणींच्या
जोश्यात हरवावं,
आणि पावसाचे थेंब मज स्पर्श
करताच हलकसं मी
त्यात भांबावून जावावं …,

प्रिती रोकडे -:) 



Monday, 11 March 2013

जसं कळीच फुल होत नाही  
तसं फुलाला फुलपण येत नाही 
मनाला कितीही सावरला 
पण आवर मात्र घालता येत नाही 
विसरायचा प्रयत्न खूप केला 
तरी आठवण काही जात नाही…. 
प्रिती रोकडे - :)