Total Pageviews

Wednesday, 26 December 2012

फिरता फिरता जंगलात 
काटा रुतला पायात 
अश्रू आले डोळ्यात 
सहन होईना वेदना आता 
पाय दुखू लागला जोरात
सांगायचं तर एकच 
चुकून सुद्धा पडायचा 
नसतं कधी प्रेमात !!!!!!!!!!!!!!
                      प्रिती रोकडे - :-)









Thursday, 18 October 2012


काय बोलू काहीच कळत नाही
काय सांगू काहीच सुचत ही नाही
फक्त आठवण येते तुझी म्हणून
आता तुझ्या शिवाय राहवत नाही
तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलास
हे पाहून माझे पाय जमिनीवर ठेकतच नाही
हर्ष होतोय मला या गोष्टीचा
माझं मन मलाच जेपत नाही..................


प्रिती रोकडे -

असेच सुचले म्हणून कधी कधी मला ही वाटते,.. 
 
कधी कधी मला ही वाटते 
या स्वप्नांच्या जगात जगावे
स्वप्नांच्या जगात जगून परी बनून उडावे,
 
 










कधी रंगीत फुलपाखरू बनून
या फुला वरून त्या फुलावर बागडावे,



 









तर कधी पक्ष्यासारखे आकाशात
उंच भरारी घेऊन उडावे,

 







कधी मोरा सारखे पिसारा फुलवून 
त्या मोरासारखे नाचावेसे  वाटते,

 







कधी पावसाप्रमाणे ढगातून थेट
जमिनीवर बर्सावेसे वाटते,

 









तर कधी नदी सारखे एका
ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी नेहमी
झुळ झुळ संथ वाहावसे वाटते ,

 





कधी मंद झुळूक वाऱ्याप्रमाणे
कुणा ला तरी स्पर्श करावेसे वाटते,

 







कधी कधी असे वाटते की लहान बाळासारखे
होऊन आईच्या कुशीत जाऊन जोपावेसे वाटते



 








                                                                          प्रिती रोकडे ......................
चालताना लागली ठेस पायाला 
जरा मागे वळून पाहिलं मी
की, तू येशील म्हणून सावरायला 
पण तू नव्हतास तिथे 
मग मीच सावरलं स्वतःला.......,

प्रिती रोकडे-
तुझ्या नकळत आता खूप काही घडू लागले 
सकाळच्या पहारी रातीचे चांदणे दिसू लागले.

प्रिती रोकडे-

हे माझ्या मना हे माझ्या मना 
ठेवलाय की दडून 
तुझ्यात मी माझा साजना
तुलाच तर कळत्यात माझ्या भावना
त्याच्या शिवाय मला काही राहावना
इथं शोधू की तिथं शोधू
कुठंच मला तो दिसना
आता मला सारखं सारखं रडवना
लई भूक लागली आता
खाते जाऊन मसाला म्यागी भुना....... :))
प्रिती रोकडे-

मैत्री हे असं नात आहे 
जसा फुलातून दरवळणारा सुवास 
मैत्री नेहमी फुलासारखी जपवावी
फूल सुकून गेले की कोमेजून जाते 
तसा मैत्रीत नेहमी असावा एक विश्वास 
तुटला तर शत्रुत्वात बदलतो...

प्रिती रोकडे-
एक चांद रात होती
त्याला तिची अन
तिला त्याची साथ होती
ना लागे नजर या रातीला 
चंद्रा सोबत चांदणी पण साक्षीला होती.
प्रिती रोकडे- :-)

Sunday, 22 April 2012

"असंच मनाला वाटलं"

          असंच मनाला वाटलं म्हणून जी व्यक्ती जेव्हा कोणाच्या नं कोणाच्या प्रेमात पडते तेव्हा तो/ती  नक्कीच त्यासाठी  वेडा/वेडी झालेली आहे असं म्हणतात. पण त्यांच्या मनात काय दडलेलं असतं हो कोणाला माहीत नसतं. त्यानां सारखा हेच वाटत असतं की ती/तो व्यक्ती आपल्या सोबतच असावा/ असावी. टी. व्ही .किंव्हा फिल्म मध्ये दाखवतात प्रेम मिळालं तर ठीक नाही तर मी नाही जगू शकत तिच्याशिवाय/ त्याच्याशिवाय असं काही तरी, पण खरं प्रेम मिळतं का कोणाला कधी?  की फक्त वर वर प्रेम करणं असं काही तरी म्हणजे एकमेकांनी केलेली एकमेकांची फसवणूक???  आपण पुष्कळदा ऐकलेल्या, वाचलेल्या प्रेम कहाण्या हिर-रांझा, सलीम- अनारकली, रोमिओ- जुलीएत, इत्यादी,..या प्रेम कहाण्या तर खरंच सच्च्या होत्या. पण खरंच प्रेमात व्यक्ती  वेडा/ वेडी होतो/ होते. त्यांना मग दिवस काय नि  रात्र काय सारखंच. सतत एकमेकांना sms करणं, फोन करून विचारणं तू कुठे आहेस? काय करतोस/काय करतेस? असं काही तरी, पण आपण जेव्हा कोणावर प्रेम करतो हेय त्या व्यक्तीला कितपत माहीत असतं आणि ती व्यक्ती आपल्यावर खरंच प्रेम करते हे माहीतच नसतं. पण आपण त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असतो. तू फक्त माझीच आहेस/तू फक्त माझाच आहेस. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही असं सारखं एकमेकांना बोलत असतात. किती गोडवा दडलेला असतो या प्रेमात खरंच..


          आता बघाना प्रेम करणं हे काही वाईट नाही असं म्हणणं यात काही गुन्हा नाही. कारण प्रेम असते दोन जीवांचा एकमेकांवर असलेला विश्वास, प्रेम असते एकमेकांचा आधार, सुखं-दुखात साथ. प्रेमात सगळं काही माफ असतं चूक ही मग तिच्या कडून होऊ किंव्हा त्याच्या कडून झाली असेल. प्रेम होत म्हणून करायचं नसतं, कोणी केलं म्हणून करायचं नसतं त्याला आधी समजून घ्याचं असतं. शाळा महाविद्यालयात आपण पहिलेच असेल की ते झालेलं पाहिलं वहिल प्रेम :) ती एकमेकांशी भिडलेली नजर, मग त्याने आपल्या मित्रांना म्हणावं मी तिला कस बोलू की तू मला आवडतेस आणि तिनेहीआपल्या मैत्रिणीला हेच म्हणावं. पण जेव्हा खरंच कोणतीही व्यक्ती कोणावर खरं प्रेम करत असते तर ते त्यांना खरंच मिळणं शक्य असतं का? तू मला भेटशील की नाही की आपला प्रेम हे फक्त स्वप्न बनूनच राहील का? प्रेम असतं एक नातं जे नातं समजून घेतल्याशिवाय त्या नात्याच्या रेशीम बंधात गुंतता येत नाही कारण नातं हे असं बंधन आहे की ते तुटल्याशिवाय तुटत नाही मग त्याला कोणाचाही अविष्कार असावा. तू माझ्या साथ आहे तर मला कश्याची भीती आहे.

मी केलेली छोटीसी कविता--
                                                                    काही नको मला
                                                                 फक्त तुझी साथ हवी
                                                  माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी 
                                                          सोडून जाऊ नकोस मला कधी 
                                                       हीच तुझ्या कडून एक अपेक्षा हवी....................,


                                                                                                                                                      प्रिती रोकडे-


Sunday, 4 March 2012

*क्षण*


तू भेटलास तो ही एक क्षण होता 
तू प्रपोज केलेस तो ही क्षण होता 
तू मला रडवलस तो पण एक क्षण होता 
तू मला हसवलस तो ही एक क्षणच होता 
तू आणि मी त्या चिंब पावसात भिजलो होतो 
तो क्षणही आज माझ्या लक्ष्यात होता 
तू मला सोडून गेलास तो क्षण 
आजही आठवतेय क्षणाक्षणाला  
तू मला तुझ्या मिठीत घेतलेस 
त्या गोड क्षणाची काय बातच निराळी होती 
सुखात तुझी साथ तो ही आनंदाचा क्षण होता
मात्र दुखात तुझी साथ नव्हती 
तो मात्र कठीण क्षण होता 
तुझ्या प्रत्येक क्षणाला आजही 
ठेवलाय माझ्या मनात जपून 
किती महत्व आहे क्षणाला 
काय क्षणाहून क्षण होते ते 
जे आठवतात अजूनही प्रत्येक क्षणाक्षणाला
मग तो/ती  ही असावा/असावी सोबत प्रत्येक क्षणाला...,
                                                    प्रिती रोकडे-


Friday, 2 March 2012

$ शेवट $


तू मला असं भेटावं आणि 
काही क्षणानंतर दूर निघून जावं 
कारण इथं पर्यंतच तुझा नी माझा शेवट लिहिला होता 

तू दिलेल्या गुलाबाच्या फूलाला जपून ठेवलंय
आणि त्याच सुकलेल्या फुलाच्या 
पाकळ्या पाहून आज तुझी आठवण येते 
कारण इथं पर्यंतच तुझा नी माझा शेवट लिहिला होता 

तू पाठवलेल्या पत्राचे प्रत्येक पान नी पान 
वाचून माझ्या मनाला समाधान होते 
आता त्या पत्राचा प्रत्येक मजकूर  
माझ्या जीवनाचा सार्थक ठरला होता 
कारण इथं पर्यंतच तुझा नी माझा शेवट लिहिला होता 
                                                           प्रिती रोकडे-

Thursday, 16 February 2012

झुळूक


वाऱ्याच्या मंद झुळकेने असे कसे बेभान केले
आलं हास्य मला माझ्या नाजूक ओठावरी
सख्या मी या वाऱ्याच्या स्पर्शाने हलकीच हरवून गेले
थंडी वाजू लागली मला म्हणून मी अंगावर पांगरुन घेऊन बसले,,,
                                                                     प्रिती रोकडे-


Saturday, 7 January 2012

"मन"

मन माझं मलाच लाजे
माझ्या अंतरीतले मन मलाच साजे
मनातूनच मन माझे मलाच बोले 
काय तुझ्या मनात मन मलाच सांगे
मनाहून तू किती मनापरी वागे 
माझ्या मना सांग ना रे मला
काय माझ्या मनात मन मला नाही आवरे
मन माझे असे बहरून आले
माझे मन तुझे कधी झाले
मलाच नाही ठाव असे
मनातून मन माझे मलाच विचारे 













प्रिती रोकडे-

Monday, 2 January 2012

तू भेटणार म्हणून मी वाट बघत बसायचं
तू येणार याच डोळ्यांना भान मात्र राहायचं
तुझ्या आठवणींमध्ये माझं मन खूप रमायचं
तू  भेटलास की मन कसं हर्षून जायचं 
मी तुझ्या कडे हळूच लाजून बघायचं
आणि तू गोड हसून माझ्याकडे पाहायचं .., :) :)




























प्रिती रोकडे-