दुख सहन केल्याशिवाय
सुख उपभोगता येत नाही
जोडल्याशिवाय जुळत नाही
बोल्याशिवाय उमजत नाही
ऐकल्याशिवाय समजत नाही
केल्याशिवाय कळत नाही
लिहिल्याशिवाय वाचता येत नाही
बघितल्याशिवाय दिसत नाही
जळाल्याशिवाय करपत नाही
पिकावल्याशिवाय उगवत नाही
कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही
प्रेमात पडल्याशिवाय प्रेम होत नाही
मैत्री केल्याशिवाय मैत्रीचे नाते जपता येत नाही
नातं समजून घेतल्याशिवाय नात्याच्या
रेशीम बंधात गुंतता येत नाही
कारण नातं हे असं एक बंधन आहे
की ते तुटल्याशिवाय तुटत नाही .....
प्रिती रोकडे .....

No comments:
Post a Comment