तू मला असं भेटावं आणि
काही क्षणानंतर दूर निघून जावं
कारण इथं पर्यंतच तुझा नी माझा शेवट लिहिला होता
तू दिलेल्या गुलाबाच्या फूलाला जपून ठेवलंय
आणि त्याच सुकलेल्या फुलाच्या
पाकळ्या पाहून आज तुझी आठवण येते
कारण इथं पर्यंतच तुझा नी माझा शेवट लिहिला होता
तू पाठवलेल्या पत्राचे प्रत्येक पान नी पान
वाचून माझ्या मनाला समाधान होते
आता त्या पत्राचा प्रत्येक मजकूर
माझ्या जीवनाचा सार्थक ठरला होता
कारण इथं पर्यंतच तुझा नी माझा शेवट लिहिला होता
प्रिती रोकडे-

No comments:
Post a Comment