तशी मी रोज ऑफिस मधून ७ :०० ला निघते आणि बस stop वर उभी राहून ८७ नंबर बसची वाट पाहते. मग बस आली कि ८:०० वाजे पर्यंत घरी पोहोचते. तारीख १७.०३.२०११, वार गुरुवार, वेळ ७:०० ला ऑफिस मधून सुटल्या वर पुन्हा रोज सारख बस stop उभी राहून बसची वाट पाहत होते पण काही करून ८७:०० नंबर बस लवकर येईना अर्धा तास वाट पाहिली मग थोडया वेळाने ९१ नंबरची बस आली. मी कशी तरी बस मध्ये चढली आणि बस मध्ये उभी राहिली, एवढी गर्दी होती कि बसण्यासाठी सीट पण खाली नव्हती. बस दादर(प्रभादेवी) पोर्तुगीज चर्च पासून ७:३० ला निघाली थोडी पुढे गेली आणि ट्राफिक एवढी होती कि ती थांबत थांबत चालत होती त्यात गर्मीचा दिवस एवढे गरम होत होते कि विचारू नका, बसयाला जागा नाही हवा यायला जागा नाही.
थोडया वेळाने बस माहीम पर्यंत आली पण तिथे हि ट्राफिक मग मला अजून राग आला आणि मी मनातच बोलू लागले कधी घरी पोहोचणार?? थोडा वेळ मी जरा शांत उभी राहिली, तितक्यात माझ्या समोर असलेल्या सीट वर बसलेल्या महिलेने मला विचारले कि किती वाजले? मी म्हणाली ७:४५ झाले. ती अजूनच विचारात पडली कि मी कधी घरी जाणार कारण तिच्या घरी तिचे लहान बाळ होते ती सारखी बोलत होती कि ते वाट पाहत असेल कि रडत असेल, तेवढयात त्या महिलेला घरून फोन आला कि कुठे आहेस ती महिला बोलली कि मी बस मध्ये आहे आणि खूप ट्राफिक आहे म्हणून काही क्षणात फोन वर बोलता बोलता फोन बंद पडला ती अजूनच वैतागली मला त्या महिले कडे पाहून जरा कीव वाटू लागली पण बस मात्र काही जागे वरून हलतच नव्हती. पण त्या महिलेची चिंता वाढतच चालली होती ती मला मधून-मधून वेळ विचारत होती कि किती वाजले.
त्यानंतर त्या महिलेच्या पुढच्या सीट वर एक मुलगी आणि तिची वाहिनी बसली होती तिच्या कडे पण लहान बाळ होते पण ते झोपलेले होते काही क्षणात ती लहान बाळ उठले आणि रडू लागले कारण त्या बाळाला गरम होत होते तिची आई तिला शांत करत होती पण ती लहान मुलगी शांत होईना खूपच रडत होती. थोडया वेळाने बस थोडी चालू झाली मग जरा थोडी हवा येऊ लागली मग ती लहान मुलगी शांत झाली. त्या मुलीची आजी पण तिच्या सोबत होती तिला हि घरची चिंता वाटू लागली कि माझे दोन मुले आहेत त्यांना हि कामाला जायचे आहे त्यांना पण जेवण नाही कधी पोहोचणार घरी?? असे त्या आजी पण बोलू लागल्या. आणि ती महिलाही हि मधून मधून बोलतच होती कधी घरी पोहोचणार ????
काही वेळाने माझ्या बाजूला उभी असलेली महिला पण मला विचारू लागली कि किती वाजले? माझ्या घरी पण माझे लहान मुल आहे ते दीड वर्ष्याचे आहे ते रडत आहे कि झोपले आहे असे मला सांगत होती. मी हि ते ऐकत होते. तशी मला पण आईची आठवण झाली कि माझी आई पण वाट पाहत असेल माझी? कोणी आपल्या हातातल्या घड्याळ कडे पाहत होती अजून किती वेळ हि ट्राफिक असणार आम्ही घरी कधी पोहोचणार? तेवढयात मी आईला फोन केला आणि सांगितले कि मला उशीर होईल घरी यायला, खूप ट्राफिक आहे आणि मी माहीम पर्यंत पोहोचली आहे तितक्यात आई बोलली कि निट ये घरी . थोडया वेळात बस माहीम पासून निघाली आणि बांद्रा पर्यंत पोहोचली सगळ्या प्रवसांच्या जीवात जीव आला आणि बस भर वेगात चालू लागली. तसा मला पण आनंद झाला कि मी आता घरी जाणार कारण मला भूक पण खूप लागली होती आणि बस मध्ये उभे राहून पाय पण दुखत होते .मग मी बांद्रा ला उतरली आणि घरी आली. घरी येऊन आई बाबांना सगळा घडलेला बस प्रवास प्रकार सांगितला .
मला फक्त या लिहिलेल्य लेखनातून एवढच सांगायचे आहे कि, आईला तिचे मुल लहान असू कि मोठे असू त्याची तिला चिंता असते. शेवटी ती एक आई आहे. बोलतात ना....,
"स्वामी तिन्ही जगांच्या आई विना भिकारी "........
प्रिती रोकडे .............
nice
ReplyDeleteaaichi mayacha vegali aste . priti .
ReplyDeletenice
ReplyDelete