तुझंविण
रातीच्या काळोखात चंद्र
ठेवी चांदण्यांचा पहारा,
असा कसा झोंबतो
हा थंड गार वारा,
हळूच स्पर्श करुनी
छेडी मज प्रेमाच्या तारा,
बरसूनी आल्या
पावसाच्या जश्या संथ धारा,
आठवून येई तुझा
प्रेमाचा गंध हा न्यारा
तुझंविण मी नाही
आणि मजविण तू
नाही असा आहे हा
नियतीचा खेळ सारा .......................
प्रिती रोकडे ..........................

Wah... chhan....
ReplyDeletethank u dhanu
ReplyDelete